तिबेटियन शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/Hon.jpg)
मुंबई- महाराष्ट्रात तिबेटियन कॅम्पमध्ये राहणारे तिबेटियन हे सुरक्षित असून त्यांच्या पुनर्वसनाबाबत शासन सर्वतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिबेटियन शिष्टमंडळाला आश्वासित केले.
तिबेटियन शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची आज मंत्रालयात भेट घेतली. यावेळी तिबेटियन पुनर्वसन धोरण-2014 बाबत निवेदन देण्यात आले. यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, तिबेटन खासदार योवडॉन, येशी डॉलमे, फेंडे गिवो, कुंचॉक यांफेल, यांच्यासह बंगळूरू, पुणे,गोंदिया व मुंबई येथील तिबेट कॅम्पमध्ये राहणारे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, देशात अनेक ठिकाणच्या कॅम्पमध्ये तिबेटियन आपल्या कुटुंबासह राहत आहेत, त्यांचे काही ठिकाणी पुनर्वसन झाले आहे. येथील परिसर व कॅम्पमध्ये खूप शांतता असते. तिबेटियन हे शांततेचा पुरस्कार करणारे असून तिबेटियन पुनर्वसन धोरण-2014 नुसार महाराष्ट्रातील काही भागात पुनर्वसन करण्यात आले आहे. तिबेटियनच्या कॅम्पसमध्ये सोयी सुविधाही राज्य शासन देत आहे. याबाबत शिष्टमंडळाने राज्य शासनाचे धन्यवाद मानले.