Breaking-newsमहाराष्ट्रराष्ट्रिय

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिनही आरोपी महिला डॉक्टरांना बेड्या

नायर रुग्णालयातील डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिनही आरोपी महिला डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. फरार झालेल्या तीन डॉक्टरांपैकी भक्ती मेहेर हिला मंगळवारीच पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. डॉ हेमा अहुजा आणि डॉ अंकिता खंडेलवाल यांचा शोध सुरु होता. दरम्यान पोलिसांनी डॉ हेमा अहुजा आणि डॉ अंकिता खंडेलवाल यांनादेखील अटक केली आहे. या तिघींनी सातत्याने केलेली जातीवाचक शेरेबाजीच डॉ तडवी हिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे.

डॉ भक्ती मेहेरला मंगळवारी दुपारी सत्र न्यायालयाच्या बाहेर अटक करण्यात आली होती. तर डॉ हेमा अहुजा हिला रात्री अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातून अटक करण्यात आली. आग्रीपाडा पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली. महिलेला रात्री अटक करणं कायदेशीर नसल्याने डॉ हेमा अहुजाला अटक करण्यासाठी न्यायाधीशांची विशेष परवानगी घेण्यात आली होती.

ANI

@ANI

Medical student Payal Tadvi suicide case: Third accused doctor Ankita Khandelwal has also been arrested by Police. Details awaited.

ANI

@ANI

Medical student Payal Tadvi suicide case: Two of the three accused doctors, Bhakti Mehre and Hema Ahuja, have been arrested. Hema Ahuja was arrested last night (in pics) while Bhakti Mehre was arrested from sessions court yesterday evening. #Mumbai

View image on Twitter
View image on Twitter
72 people are talking about this

डॉ. पायल यांनी या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून म्हणजेच मागील वर्षभरापासून या तिघी पायलला छळत होत्या. जातीवाचक टीपण्णी करत होत्या. या तिघी कशाप्रकारे त्रास देतात हे पायलने सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तिचे म्हणणे कुणीही ऐकून घेतले नाही. दरम्यान तिच्या आत्महत्येनंतर या तिघीही फरार होत्या.

दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी या उद्देशाने एक पत्र नायर रूग्णालयाच्या संचालकांना लिहिलं आहे. पायल तडवीच्या मृत्यूबाबत नायर रूग्णालयाच्या अधिष्ठात्यांनाही पत्र लिहिण्यात आलं होतं. पायलच्या आई वडिलांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पायल तडवीचा मृत्यू ही हत्या असल्याचा आरोप केला आहे. तसेच या रूग्णालयातले डॉक्टर सलमान यांनीही हा आरोप केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button