breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

‘डेक्कन क्वीन’ धावणार नव्या रुपात; २५ वर्षांनंतर नवे अत्याधुनिक डबे, रंगसंगतीही बदलणार

पुणे | महाईन्यूज

पुणे-मुंबई दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्यांची लाडकी गाडी असलेल्या डेक्कन क्वीन अर्थात दख्खनच्या राणीचे रूपडे नव्या वर्षांत पालटणार आहे. गाडीला २५ वर्षांनंतर नवे अत्याधुनिक व वाढीव डबे जोडण्यात येणार असून, रंगसंगतीतही आकर्षक बदल करण्यात येणार आहेत.पुणे-मुंबई प्रवासासाठी १ जून १९३० रोजी सुरू झालेली डेक्कन क्वीन अल्पावधीतच लोकप्रिय झाली.

पुणे-मुंबई विनाथांबा असलेल्या या पहिल्या गाडीची नोंद लिम्का बुकमध्ये झालेली आहे. त्याचप्रमाणे तिला ‘आयएसओ’ गुणवत्तेचे प्रमाणपत्रही मिळाले आहे. सुसज्ज ‘डायनिंग कार’ हेही या गाडीचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. पुणे-मुंबई रोजचा प्रवास करणारे नोकरदार, व्यापारी, वकील, मंत्रालयीन अधिकारी यांच्यासाठी ही गाडी ‘सेकंड होम’ म्हणूनही ओळखली जाते. नव्वदाव्या वर्षांत या गाडीचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यानुसार जानेवारी २०२० मध्ये डेक्कन क्वीन नव्या स्वरूपात धवणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button