Breaking-newsमहाराष्ट्र
डहाणूच्या समुद्रकिनाऱ्यावर 2 मृतदेह आढळल्याने खळबळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/drowing-400_201907261598.jpeg)
डहाणू – डहाणू तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर आज एकाच दिवशी दोन अज्ञात मृतदेह आढळून आले असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उंडाली.
डहाणूच्या चिखले आणि नरपड समुद्र किनाऱ्यावर हे दोन्ही मृतदेह नागरिकांना आढळून आले. हे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने चेहरा दिसत नसला तरी गळ्यातील दोऱ्यावरून एक व्यक्ती ख्रिश्चन समाजाचा असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. चिखले येथे घोलवड पोलीस तर नरपड येथे डहाणू पोलीस पोचले असून, दोन्ही ठिकाणी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आहे.