ट्रॅकमनच्या तत्परतेमुळे वाचले हजारो रेल्वे प्रवाशांचे प्राण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/Tarunajy.jpg)
ट्रॅकमनने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. तरूणंजय कुमार नावाचा ट्रॅकमन वेदच्छा- नवसारी या ठिकाणच्या रेल्वे मार्गावर ऑन ड्युटी होता. ७ तारखेच्या रात्री तो ड्युटीवर आला तेव्हा ओव्हरहेड वायर तुटल्याचे त्याला समजले. रात्री १२.३० च्या सुमारास त्याला ही घटना घडल्याचे कळले त्याने अजिबात वेळ न घालवता ट्रॅकवर ओव्हरहेड वायर तुटल्याचे नवसारी रेल्वे कार्यालयात कळवले. त्यामुळे या वायरचे काम दुरूस्त होईपर्यंत गुजरातमधील नवसारी ट्रॅकवरून गाड्यांची वाहतूक त्याच्या एका सूचनेमुळे थांबवण्यात आली. ट्रॅकमन तरूणंजय कुमारने आपल्या कामात जी तत्परता आणि प्रसंगावधान दाखवले त्यामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. त्याने दाखवलेले हे प्रसंगावधान नक्कीच कौतुकास्पद आहे. तरूणंजय कुमार हा पश्चिम रेल्वेचा कर्मचारी आहे. त्याने ओव्हरहेड वायर तुटल्याचे जे काम केले त्याबाबत पश्चिम रेल्वेने ट्विट करत त्याचे कौतुक केले आहे.त्याने ही सूचना दिली नसती तर मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. इतकेच नाही तर हजारो प्रवाशांचा जीवही जाऊ शकला असता. पण त्याने तत्परता दाखवली आणि मोठा अनर्थ टळला.