जळगावातील दिग्गज नेत्या अस्मिता पाटील यांची भाजपाला सोडचिठ्ठी
![Veteran Jalgaon leader Asmita Patil leaves BJP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/अस्मिता-पाटील.jpg)
जळगाव – दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला हादरा देत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतल्यानंतर खानदेशात भाजपाला गळती लागल्याचं चित्र आहे. आता भारतीय जनता पक्षाच्या जळगाव ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा अस्मिता पाटील यांनीही भाजपाला राम राम ठोकला आहे. आता त्या खडसेंपाठोपाठ घड्याळ हाती बांधणार की शिवबंधनात बांधल्या जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
प्रा. डॉ. अस्मिता पाटील या जळगाव भाजपाच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा आणि ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियानाच्या राज्य सदस्या होत्या. ‘मी अस्मिता नित्यानंद पाटील वैयक्तिक कारणास्तव भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे’, असे पत्र त्यांनी जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुरेश भोळे यांना लिहिले आहे.
दरम्यान, अस्मिता पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादीसोबत काही वर्ष काम केले होते. त्यामुळे आता त्या खडसेंच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.