विद्यार्थ्यासोबत अनैसर्गीक संबंध आणि आत्महत्या प्रकरणात १४ जणांना अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/5-14.jpg)
चंद्रपूर – अनैसर्गिक पद्धतीने समलिंगी संबंध ठेवल्यामुळे पीडित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी १४ विद्यार्थ्यांना अटक केली. अटक केलेले सर्व आणि मृत तरूण हे सर्व एकाच वसतीगृहात राहात होते. १८ जानेवारी रोजी पीडित तरुणाने वसतीगृहातील त्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने १८ पानाचे एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये आपल्यावर कशा पद्धतीने लैंगिक अत्याचार करण्यात आले, याचा उल्लेख त्याने केला आहे.
चंद्रपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जानेवारीला चंद्रपूरमधील सेवा दल वसतीगृहामध्ये पीडित तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. तो बारावीत शिकत होता. त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्यावर कशा पद्धतीने सहकारी विद्यार्थ्यांकडून लैंगिक अत्याचार केले जात होते, याची सविस्तर माहिती दिली आहे. याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी वसतीगृहातील १४ जणांना अटक केली.
आत्महत्येस प्रवृत्त करणे, अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यास बळजबरी करणे, या अंतर्गत या सर्व तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोक्सो अंतर्गतही या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.