breaking-newsमहाराष्ट्र

चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळाचा मृत्यू

चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात आठवडाभरात तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून मंगळवारी मूल तालुक्यात एका मेंढपाळाला वाघाच्या हल्ल्यात प्राण गमवावा लागला.

मूल तालुक्यातील येरेगाव येथे राहणारे मारुती पुठावार हे मेंढपाळाचे काम करत होते. मंगळवारी दुपारी गावातील जंगलात मारुती पुठावार यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची तिसरी घटना
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची ही आठवडाभरातील तिसरी घटना आहे. शनिवारी दक्षिण ब्रह्मपुरी वनपरीक्षेत्राअंतर्गत हडदा येथे वाघाने गुराख्यावर हल्ला केला होता. यात दिवाकर गेडाम असे या गुराख्याचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी ९ जानेवारी रोजी जंगलात चारा आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. राजू नागेश्वर गुजलवार (३५) असे या तरुणाचे नाव होते. लोहारा गावात राहणारा राजू हा चारा आणण्यासाठी जंगलात गेला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button