Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
घाटी रुग्णालयातील कोविड डॉक्टर संपावर
!['Medical emergency' in Rajapur taluka due to resignation of four doctors](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/22doctor_2_49.jpg)
औरंगाबाद- राज्यातील शिकावू डॉक्टरांना कोविड भत्ता दिला जात आहे. परंतु घाटी रुग्णालयातील शिकावू डॉक्टरांना या भत्त्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. मुंबई-पुण्याप्रमाणे आम्हालाही वाढीव भत्ता मिळावा अशी मागणी करत घाटी रुग्णालयातील तब्बल दीडशे कोविड डॉक्टरांनी संप पुकारला आहे.
आज सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात एकत्र येत कोविड भत्त्याच्या मागणीसाठी डॉक्टरांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिकावू डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. भत्ता मिळाला नाही तर कोविड वॉर्डात रुग्णसेवा देणार नाही, असा इशाराही यावेळी संपकरी डॉक्टरांकडून देण्यात आला.