गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम दिलासा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/whatsapp-image.jpeg)
नवी दिल्ली | महाईन्यूज
भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरण गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. १६ मार्चपर्यंत या दोघांना अटक न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयांत देत अंतरिम दिलासा दिला आहे. १६ मार्चला पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा पार पडणार आहे.
अलीकडेच भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळला होता. मात्र, मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोघांना अटकेपासून ४ आठवड्यांचा दिलासा देण्यात आला होता. कोरेगाव भीमा हिंसाचार व शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपी असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा व प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल हायकोर्टाने राखून ठेवला होता. त्याशिवाय या दोघांना सुनावणीदरम्यान उपस्थित राहण्याचा आदेश न्यायालयाने द्यावा, या राज्य सरकारच्या अर्जावरील निर्णयही न्यायालयाने राखून ठेवला होता.