महाराष्ट्र

गुन्हे दाखल झालेल्या साडेसात हजार मराठी मुलांना नोक-या कशा मिळणार – राज ठाकरे

नवी मुंबई – मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या साडेसात हजार मराठी मुलांवर ३०७ कलमाखाली खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उद्या आरक्षण जरी लागू झाले तरी या साडेसात हजार लोकांना नोकरी मिळणार नाही. एकीकडे आंदोलन पेटवायचे आणि दुसरीकडे गुन्हे दाखल करून अशा युवकांचे आयुष्य उद्धवस्त करण्याचे काम सरकार करत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.

 

नवी मुंबई येथे आयोजित कर्मचारी संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीकास्त्र सोडले. देशात एकीकडे इतक्या समस्या आहेत. त्या सोडवायचे टाळून नरेंद्र मोदी हे योगाभ्यास करत असल्याचा टोला त्यांनी लगावला. राज्यासह देशभरात लाखो जागा रिकाम्या आहेत. या जागा भरल्या तर आरक्षणाची गरजच भासणार नाही. पण या सरकारकडे पैसेच नाहीत. त्यामुळे ते जागा भरत नाहीत. पण सभांमधून लाखो कोटींचा निधी देण्याचे आश्वासने दिली जातात. पण यांच्याकडे पैसेच नाहीत. हे कुठले पैसे देणार असे म्हणत जर सरकारने रोजगार दिला तर यातून लाखो कुटुंबं उभी राहू शकतात. आज प्रत्येक पक्ष राजकरण करतंय. सुधारणा घडवून आणण्याचा कोणीच प्रयत्न करताना दिसत नाही.

 

यावेळी त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा अध्यक्षांची भाजपाला परंपरा आहे. पण आज काय झालं आहे, असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला. देशभरात सध्या संमोहनाचे प्रयोग सुरू आहेत. एखादा मुद्दा निघाला की, तो विसरण्यासाठी दुसरा काढला जातो. पण जसजशा निवडणुका येतील. मी मागचं सर्व उकरून काढणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button