Breaking-newsपुणेमहाराष्ट्र
गायब झालेली ‘ती’ सहा मुले घरी सुखरूप परतली
हडपसर येथील एका मैदानातून अचानक गायब झालेली मुले त्यांच्या घरी बिहार येथे सुखरूप पोहोचली.महम्मदवाडी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. महंमदवाडी येथील मदरसामध्ये शिकणाऱ्या या मुलांना आपल्या पालकांना भेटण्याची इच्छा होती. त्यामुळे ही सहा मुले 3 जुलै रोजी हडपसर येथील एका मैदानातून गायब झाली होती.
सहमद आसार उद्दीन रजा (13, बिहार), अन्नान महंम्मद आजाद शेख (12), अहसान निजाम शेख (15), शाहनवाज जमालुउद्दीन शेख (16), अन्वारुल इसराइल हक (13) आणि रिजवान आलम सलमुद्दीन शेख (15) अशी गायब झालेल्या मुलांची नावे आहेत. ही सर्व मुले पुण्याहून रेल्वेने बिहारमधील त्यांच्या गावी पोचली.