Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंबोलीत 7 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय

तळकोकणातील मुख्य पर्यटन असलेल्या आंबोलीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुढील एक महिन्याचा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय.

गोव्यात ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंबोली घाटमार्गाचा उपयोग केला जातो. आंबोलीत बाहेरुन येणारे लोक बाजारपेठत थांबतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हा संभाव्य धोका लक्षात घेता आंबोली ग्रामपंचायत आणि कोरोना नियंत्रण गाव समितीने आंबोलीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे 7 सप्टेंबरपर्यंत आंबोली गावात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय, बाजार पेठा पूर्णपणे बंद राहणार असून गावाबाहेरील व्यक्तींनाही गावात येण्यास पूर्णतः मज्जाव करण्यात आला आहे. तसा ठराव देखील घेण्यात आला आहे. या निर्णयाचे आंबोली वासीयांनीही स्वागत केलय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button