Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
कोल्हापूरात भूमाता बिग्रेडच्या माधूरी शिंदे यांची पतीने केली हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/madhuri-shinde.jpg)
कोल्हापूर – उदगाव येथील पती-पत्नीमध्ये पाच-सहा वर्षांपासून वाद सुरु होता. या वादातूनच माधुरी सूर्यकांत शिंदे यांचा पतीने खून केला आहे. ही घटना आज (शनिवारी) दुपारी बाराच्या सुमारास घडली.
या घटनेनंतर पती स्वतःहून जयसिंगपूर पोलिसात हजर झाला. वर्षांपासून पती पत्नीत मोठा वाद असल्याने ते वेगळे राहत होते. पतीने यापूर्वीही डोक्यात लोखंडी पहार घातली होती. तसा गुन्हा यापूर्वी जयसिंगपूर पोलिसांत नोंद होता. आठ दिवसांपूर्वी पती आणि सासूने माधुरी यांच्या खोलीतील वीजपुरवठा खंडित केला होता. घटनेनंतर जयसिंगपूर पोलिसांची कुमक घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, माधूरी शिंदे या तृप्ती देसाई यांच्या भूमाता बिग्रेडच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षा असल्याचे समजते. त्यांची पतीनेच हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.