कोल्हापुरात विवाहितेवर सामूहिक बलात्कार, आरोपींपैकी एक अल्पवयीन
कोल्हापूर – कोल्हापुरात एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पन्हाळा तालुक्यात ही घटना घडली अशून या प्रकरणी पोलीस तपास करण्यात येत आहे. धक्कादायक माहिती म्हणजे बलात्कार करणाऱ्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग आहे.
एक विवाहीत महिला आपल्या दीड वर्षाच्या मुलीला घेऊन शेजारील घरात गप्पा मारण्यासाठी गेली असता तिच्यावर बलात्कार करण्यात आला. महिला ज्या घरात गेली त्या घरात कोणीच नसल्याने ती परतत असताना तिला हात पकडून घरातील आरोपीने तिला खाटेला बांधले आणि आत्याचार केला.
याप्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात एका अल्पवयीनसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर विवाहितेवर बलात्कार करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलगाही असल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
या घटनेचा कोडोली पोलीस तपास करत असून पीडित महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याचं सांगण्यात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या वैद्यकीय चाचण्याही करणं आवश्यक आहे. दरम्यान, त्यांची दीड वर्षांची मुलगी सुखरूप आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत असून घरातील इतरांची चौकशी करत असल्याचं माहिती देण्यात आली आहे.