breaking-newsमहाराष्ट्र

कोरोना नियमांचे पालन न केल्याने दोन दिवसात; शहरातील 13 दुकानदारांकडून 65 हजार रुपयांचा दंड वसूल

नांदेड । महाईन्यूज  । प्रतिनिधी

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात कोरोना विषयक नियम लागू केले आहेत. नांदेड वाघाळा शहर महापालिका क्षेत्रात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आज दुसऱ्या दिवशी सहा दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 19 व 20 मे या दोन दिवसात नांदेड शहरातील 13 दुकानदारांकडून 65 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. व्यवसायिकांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शहरातील दुकाने सुरु करण्याची सशर्त परवानगी दिली. तर काही दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व निश्चित केलेल्या नियम व अटी न पाळणाऱ्या दुकानावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपआयुक्त विलास भोसीकर व सुधिर इंगोले यांच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बुधवार 20 मे रोजी दुसऱ्या दिवशी या पथकाने गुरुकृपा कलेक्शन रविनगर चौक कौठा, अपना ड्रेसेस वजिराबाद, लक्ष्मी कापड श्रीनगर नांदेड, मयुर मेन्स वेअर आनंदनगर नांदेड या दुकानांना परवानगी नसताना दुकाने उघडल्याबद्दल तसेच आर.सी.एफ शॉपर्स मार्ट श्रीनगर नांदेड, महालक्ष्मी ऑईल शोरुम आनंदनगर नांदेड यांनी दुकानामध्ये पाचपेक्षा जास्त लोक जमविल्यामुळे तर बालाजी किराणा ॲन्ड जनरल स्टोअर्स सिडको यांनी निर्धारित वेळेवर दुकाने बंद न केल्याने या सात दुकानांना पथकाच्यावतीने प्रत्येकी 5 हजार रुपये असे कएुण 35 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

तसेच मंगळवार 19 मे रोजी या पथकाने नांदेड शहरातील सहा व्यवसायिकांनी सुरक्षित अंतर न ठेवणे, दुकाने उघडण्याची परवानगी नसताना दुकाने उघडणे, ठरवून दिलेल्या वेळेत दुकाने बंद न करणे यासाठी प्रत्येकी 5 हजार रुपये याप्रमाणे 30 हजार रुपये दंड वसुल केला आहे. दोन दिवसात एकुण 13 दुकानदारांकडून 65 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

नांदेड मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विलास भोसीकर, सुधीर इंगोले यांच्या पथकाने रमेश चवरे, औकार स्वामी, अशोक भांगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button