Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोयनानगर आणि पालघर परिसरात भूकंपाचे धक्के

पाटण – तालुक्यातील कोयनानगर आणि पालघर जिल्ह्यातील परिसरात आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या दोन्ही ठिकाणी साधारण ५ मिनिटांच्या फरकाने झालेल्या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. कोयनानगरचा भूकंप आज सकाळी ७.५५ मिनिटांनी, तर पालघर परिसरातील भूकंप ८ वाजण्याच्या सुमारास जाणवला.

कोयनानगरच्या भूकंपाची रिश्टर स्केल तीव्रता २.६ इतकी, तर पालघरच्या भूकंपाची रिश्टर स्केल तीव्रता ३.५ इतकी नोंदली गेली.पालघर भूकंपाचा केंद्रबिंदू मुंबईपासून १०२ किलोमीटरवर होता. परवाच राज्यात तीन वेळा भूकंपाचे धक्के बसले होते. नाशिकमध्ये रात्री १२ वाजण्याच्या सुमारास लागोपाठ दोन धक्के जाणवले. तर मुंबईतही सकाळी ६.३५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले होते. तसेच तीन आठवड्यापूर्वी कोयना धरण परिसरातही ३.१ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप जाणवला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button