कृत्रिम दंतशास्त्रामध्ये भरीव संशोधनाची गरज : डॉ.नितीन राऊत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Raut-1.jpg)
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
सध्याच्या काळात कृत्रिम दंतशास्त्राचे महत्व अतिशय मोलाचे असून त्यात आणखी भरीव संशोधन होणे गरजेच आहे, असे प्रतिपादन ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले.
‘भारतीय कृत्रिम दंतशास्त्रतज्ज्ञ दिवस’ संपूर्ण देशात 22 जानेवारी रोजी साजरा केला जातो. त्यानुसार शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून श्री.राऊत बोलत होते.
सध्या विज्ञान व तंत्रज्ञानाने जगात मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे आरोग्य, शरीरशास्त्र याबाबत आपल्याकडे जागरुकता देखील वाढलेली आहे. म्हणून आपण सर्वप्रथम आपल्या दाताकडे अथवा दाताची निगा राखण्याकडे लक्ष देतो. दंतशास्त्रामध्ये उपचार करताना दंतवैद्य दातांच्या सौंदर्यासोबत व्यक्तीचे सौंदर्यही वाढविता हे अभिनंदनीय आहे. कोणत्याही विज्ञान, तंत्रज्ञानाच्या प्रगत संशोधनानंतर ते कृतीत ऊतरविण्याचे काम केले जाते. त्यानंतरच त्याचे सौदर्य अधिक खुलते, असेही श्री.राऊत म्हणाले.
या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, सहसंचालक (दंत) तथा अधिष्ठाता डॉ.विवेक पाखमोडे, डॉ.फिरोज मिर्झा, कृत्रिम दंतशास्त्राच्या प्रमुख डॉ.ज्योती टेंभूर्णे व विद्यार्थी उपस्थित होते.