कुख्यात गुंड महाकालीचा भाऊ पुणे जिल्ह्यातून तडीपार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/gubda.jpg)
पुणे:- कुख्यात कुंड महाकाली याचा सख्खा भाऊ आणि आणखी एका आरोपीला देहूरोड पोलिसांनी दोन वर्षांकरिता पुणे जिल्ह्यातून तडीपार केलं आहे. मनोज उर्फ डिंगऱ्या फुलचंद ढकोलिया आणि जोयेल भास्कर पिलाणी अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मनोज उर्फ डिंगऱ्या फुलचंद ढकोलिया हा कुख्यात गुंड महाकालिचा भाऊ आहे. दोघांवर ही गंभीर गुन्हे दाखल आहेत.
कुख्यात कुंड महाकाली याचा काही वर्षांपूर्वी एन्काऊंटर करण्यात आला होता. त्यानंतर त्याचा सख्खा भाऊ मनोज उर्फ डिंगऱ्या हा गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय झाला होता. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग आर्म ऍक्ट आणि दरोडा टाकणे, जाळपोळ, वाहनांची तोडफोड असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तर जोयेल भास्कर पिलाणी याच्यावरदेखील अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरोडा घालणे, जाळपोळ करणे, दंगल करून वाहनांची तोडफोड करणे असे गुन्हे पिलाणी याच्यावर दाखल आहेत. त्यामुळे दोघांवर तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. दोघेही देहूरोड पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. गुंडांची दहशत फोफावल्याने लोकांमध्ये त्यांची दहशत निर्माण होऊ लागल्याने ही कारवाई करण्यात आली आल्याचे पोलिसांनी सांगितले.