कार्यकर्त्यांनो नागरिकांचे प्रश्न सोडवा – कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस सत्यजीत देशमुख
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/IMG-20180609-WA0003.jpg)
- पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहोचवा
- नागरिकांच्या अडीअडचणी समजून घ्या
सागाव (वार्ताहर)- गावोगावच्या कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून काँग्रेस पक्षाची ध्योयधोरणे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवावीत. नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेत, त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले.
वाडीभागाई (ता.शिराळा) येथे भाजप व शिवसेना कार्यकर्ते तानाजी पाटील, बाबासो पाटील, बाबासो संकपाळ, संजय चव्हाण यांनी त्यांच्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी त्यांचा देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जि. प. सदस्य के. डी. पाटील, आनंदराव पाटील, अशोक पाटील, सुहास पवार, संपत पाटील, उदय नायकवडी, तानाजी पाटील, प्रदिप शेटे, सतीश सुतार, विश्वास लुगडे, अरूण पाटील, मानसिंग पाटील, जयसिंग लुगडे, सुनिल पाटील, अमित कांबळे, आनंद पावले, गणेश रसाळ, शितल कुराडे आदी उपस्थित होते.
देशमुख पुढे म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात असणारे भाजपचे सरकार कशा पद्धतीची ध्येयधोरणे राबवून जनतेची किंबहुना सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करीत आहे. हे सर्वजण आपण अनुभवत आहोत. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर तरी रोज काही रुपयांनी वाढत आहेत, व नंतर काही पैशांनी कमी होत आहेत. पेट्रोल व डिझेलचे दर वाढले की, जीवनावश्यक वस्तूंचे देखील दर वाढत आहेत. यातून तळागाळातील लोक भरडले जात आहेत. हे आता ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसे आता ओळखू लागले आहेत. काँग्रेस पक्षाला शेकडो वर्षाची व सर्वसामान्य लोकांचा पक्ष म्हणून परंपरा आहे. त्यामुळेच आता इतर पक्षातून काँग्रेस पक्षात नव्याने कार्यकर्ते दाखल होऊ लागले आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपापसातील मतभेद विसरुन, कार्यकर्त्यांनी सामान्य लोकांपर्यंत पोहोचून त्यांना आपल्या स्तरावरती जे सहकार्य करता येईल, ते करण्याची भूमिका निभावणे गरजेचे आहे.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत लुगडे यानी केले.
शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले तानाजी पाटील म्हणाले, विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी शिराळा तालुक्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन सत्यजित देशमुख हे सुद्धा सर्वसामान्य लोकांसाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांना ताकद देऊन काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी यापुढे काँग्रेस पक्षाच्या प्रवाहातून प्रयत्न करणार आहे.
सागावचे संग्रामसिंह पवार म्हणाले, शिवाजीराव देशमुख यांनी तालुक्यातील गाव, वाडी, वस्ती विकसित करण्यासाठी भरघोस निधी देत कायापालट केला आहे. सत्यजित देशमुख हे सुद्धा साहेबांच्या पावलावरती पाऊल ठेवून कार्यरत आहेत. त्यांना ताकद देऊन २०१९ ला आमदार करण्यासाठी गावोगावी संघटन होऊन त्यांच्या पाठिशी सर्वांनी उभे राहणे गरजेचे आहे.