Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
काँग्रेस आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात
यवतमाळ – काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. यवतमाळहून नागपूरकडे येत असताना हा अपघात झाला असून, अपघातात ते थोडक्यात बचावले.
वाचा :-राज्यात २७ जानेवारीपासून सुरू होणार प्रत्यक्ष शाळा
वजाहत मिर्झा हे यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देखील आहेत. शुक्रवारी 9.30 वाजताच्या सुमारास यवतमाळ-नागपूर रोडवर रात्री अपघात झाला, त्यात त्यांच्या आईला किरकोळ दुखापत झाली.
‘चाचा का ढाबा’ जवळ त्यांच्या गाडीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने धडक दिली. कारच्या चालकाने मद्य प्राशन केले होते, असे सांगितले जाते. या अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे.
वाचा :-आपण एक क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत- मुख्यमंत्री
दरम्यान, डॉ. वजाहत मिर्झा हे 2018 साली काँग्रेसकडून विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आले होते.




