Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
कल्याणमधील आगीत दोन दुकाने जळून खाक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/kalyan.jpg)
मुंबई : कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड परिसरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानाला रविवारी सकाळी भीषण आग लागली. यात दोन दुकाने जळून खाक झाली. सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सकाळी दुकाने बंद असताना तेथून अचानक धूर येउ लागला. त्यामुळे अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, हे पथक तिथे पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. सुमारे तासाभरानंतर आग आटोक्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.