breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कर्नाटकातील गुलबर्गा येथे महाराष्ट्राच्या बसला लावली काळी शाई
![Black ink applied to a Maharashtra bus at Gulbarga in Karnataka](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/bus.jpg)
गुलबर्गा – महाराष्ट्र बेळगाव यांच्यातील सीमेवाद आता टीकेला पोहोचला आहे. कारण, कर्नाटकातील गुलबर्गा येथे कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या बसला काळी शाई लावली. लाल पिवळा कन्नड ध्वज हातात घेतलेल्या कार्यकर्त्यांनी गुलबर्गा-सोलापूर बस थांबवून घोषणाबाजी केली आणि काचेवर काळी शाई लावली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाभाग महाराष्ट्रात घेणारच असे जाहीर केल्यानंतर कन्नड संघटना अस्वस्थ झाल्या आहेत. त्यातच पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव, निपाणी, कारवार संयुक्त महाराष्ट्र होणारच असे पोस्टर कर्नाटकच्या बसवर लावले होते. त्याचे पडसाद कर्नाटकात उमटले आहेत.