breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता विळखा; आज जिल्ह्यात 74 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा विळखा कमी होताना दिसत नाहीये. आज सकाळी जिल्ह्यात 74 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली . त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधितांची संख्या 16 हजार 827 इतकी झाली आहे. त्यापैकी 12 हजार 346 रुग्ण बरे झाले असून 554 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 3 हजार 927 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितलंय…

आज सकाळी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा भागातील 55 तर ग्रामीण भागातील 19 जणांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या चार महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जुलै महिन्यात जिल्ह्यात 8 हजार 840 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. या काळात 218 कोरोनाबाधितांचा मृत्यूही झाला.

दरम्यान, मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै या 5 महिन्यांत सर्वाधिक कोरोना रुग्ण हे जुलै महिन्यातच आढळून आले. विशेषतः जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्यास सुरूवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे.

औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापारी, विक्रेत्यांचीही अँटीजेन टेस्ट केली जात आहे. या उपाययोजनांमुळे शहरातील कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा बसत आहे. असं असलं तरी शहरात दररोज 100 च्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान, गेल्या आठवडाभरात शहरात 60 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button