breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

औरंगाबादच्या सिडको परिसरात बिनधास्त फिरतोय बिबट्या

औरंगाबाद – जंगलात आढळून येणारा बिबट्या औरंगाबाद शहरात दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहरातील सिडको एन १ या भागात बिबट्या आढळून आला आहे. रहिवासी भागात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाचे पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

औरंगाबाद शहरातीस सिडको एन १ हा भाग गजबजलेला भाग आहे. येथील काळा गणपती मंदिर परिसरात बिबट्या आढळून आला. बिबट्या येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या सध्या एका बंगल्याच्या आवारात असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button