breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

ऑपरेशन ब्लॅकफेस : बाल पोर्नोग्राफीविरोधी मोहीम: गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

जानेवारीच्या मध्यापासून ऑपरेशन ब्लॅकफेस या मोहिमेअंतर्गत आम्ही बाल पोर्नोग्राफीत अडकलेले, तसेच बालकांवर लैंगिक अत्याचार करणारे, त्याचप्रमाणे बाल पोर्नोग्राफीच्या व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींवर नजर ठेवून आहोत. महाराष्ट्र सायबर विभाग ही कारवाई करत आहे. बाल पोर्नोग्राफी ही समाजाला लागलेली एक कीड आहे. अतिशय विकृत आणि किळसवाणा असलेला हा प्रकार.. याच्या विरोधात गृह विभाग अतिशय कठोर पाऊल उचलत असून हे विकृत आता यापुढे जास्त काळ मोकळे राहणार नाहीत. यांच्यावर आमची नजर असून लवकरच हे गुन्हेगार आपल्याला गजाआड म्हणजे तुरुंगात गेलेले पाहायला मिळतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात १३५ गुन्हे ४८ व्यक्तींना अटक

आतापर्यंत १३५ गुन्हे रजिस्टर झाले असून ४८ व्यक्तींना भा.दं.वि. कलम २९२ सह कलम १४,१५ पोस्को व ६७,६७ अ,६७ ब आय.टी. अॅक्ट अंतर्गत अटक करण्यात आलेली आहे. या १३५ प्रकरणांपैकी एक अकोला येथील आहे (आयपीसी कलम. २९२); ४२ पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, परभणी, पुणे, नागपूर (पॉस्को) आणि ९२ मुंबई, कोल्हापूर, अमरावती, अहमदनगर, रायगड, नाशिक ग्रामीण, नाशिक शहर, गोंदिया, बीड, भंडारा, परभणी, नंदुरबार, चंद्रपूर, लातूर, ठाणे  ग्रामीण, अमरावती ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर, हिंगोली, नवी मुंबई, धुळे, पालघर, नाशिक ग्रामीण, जालना, वाशिम, सातारा, जळगाव, पुणे ग्रामीण, बुलढाणा, नागपूर ग्रामीण, वर्धा, ठाणे, सांगली, रत्नागिरी, यवतमाळ आणि लातूर (आयटी कायदा) असे आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button