breaking-newsमहाराष्ट्र

उरणमध्ये सापडला 35 किलोच्या’जिताडा’ मासा

उरण : खोपटा भेंडखळ समुद्री खाडीत लावण्यात आलेल्या वाणा प्रकारच्या मासेमारीत मत्स्यप्रेमींना हवाहवासा जिताडा मासा सापडला. भेंडखळ गावातील अरुण ठाकूर या मासेमाराला तब्बल 35 किलो वजनाचा जिताडा मासा मिळाला. करंजा गावात तब्बल 35 हजार रुपये मोजून एका खवय्याने हा मासा खरेदी केल्याची माहिती आहे.

‘मासळीचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिताडा माशाने लॉकडाऊनच्या काळात या मासेमाराला चांगलेच तारले असल्याचे समोर आले आहे.

रायगड जिल्ह्यातील जिताडा मासा म्हणजे अगदी पापलेट, हलव्याला देखील बाजूला ठेवणारा मासा म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या काळी तर पैशाने जी कामे होत नव्हती, ती या जिताडा माशाने अगदी लीलया होत असायची.

राज्याच्या अनेक मंत्र्यांना रायगडच्या जिताड्याची उत्सुकता असायची आणि जिताड्याच्या भेटीने अनेक कामे करुन घेतल्याची उदाहरणे पूर्वीच्या काळातील जुने राजकारणी सांगत असत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button