Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/railway-.jpg)
मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रविवार ३ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर, रुळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. माटुंगा ते ठाणे डाऊन धीम्या मार्गावर स. ११.२० ते दु. ४.२० पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकांवर गाड्या थांबणार नाहीत.
हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रेदरम्यान अप-डाऊन मार्गावर स. ११.१० ते दु.४.४०पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. ट्रान्सहार्बर आणि मध्य रेल्वेवरून हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्यांना स. १० ते सायं. ६ पर्यंत प्रवासास मुभा आहे.