breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘उद्याची पिढी घडवण्याची जबाबदारी आमचीच’, रोहित पवारांकडून कर्जत-जामखेडमध्ये ऑनलाईन शिक्षणाचा अनोखा प्रयोग

अहमदनगर | सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद आहे. त्यामुळे सर्वत्र ऑनलाईन शिक्षण पद्धत वापरली जाऊ लागलीये. हीच परिस्थिती लक्षात घेऊन आमदार रोहित पवारांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन तंत्रज्ञान विकसित करण्यात आलंय. सध्या याचीच चर्चा या मतदारसंघात सुरु आहे.

राज्यात सध्या कोरोनाचं मोठं संकट उभे राहिली आहे. त्यामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ऑनलाईन शाळेचा पर्याय समोर आला. मात्र यात अनेक अडचणी समोर येत आहेत. या सर्व अडचणी लक्षात घेऊन कर्जत-जामखेड तालुक्याचे आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नविन तंत्रज्ञान विकसित करण्यात आलंय. कोरोनामुळे राज्यात जूनमध्ये सुरु होणाऱ्या शाळा अजूनही सुरू झालेल्या नाहीत. राज्य सरकारने ऑनलाइन शाळा सुरु करण्यास सांगितलं. मात्र शिक्षकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अभ्यास देण्यापलीकडे ऑनलाईन शाळेचा कोणताही प्रयोग यशस्वी करता आलेला नाही.

“ऑनलाईन शाळा सुरु करण्यासाठी शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. गेल्या दोन अडीच महिन्यांपासून आम्ही या अॅपवर काम करतो आहे. यात 1400 शिक्षकांचं ट्रेंनिग पूर्ण केले आहे. सध्या 12 हजार 500 विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आहे. तर 6 हजार मूल मुली रोज ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. हा आकडा आम्ही वाढवणार असून उद्याची पिढी घडवण्याची जबाबदारी आमचीच आहे”, असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलंय.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button