breaking-newsपुणेमहाराष्ट्र

आषाढी एकादशीमुळे साबूदाणा, खजुर, रताळी आणि भुईमुग शेंगाना मागणी

पुणे– आषाढी एकादशीनिमित्त मार्केट यार्डात उपवासाच्या पदार्थांना उलाढाल वाढली आहे. साबुदाणा, खजुरासह रताळी आणि भुईमूगाच्या शेगांना पुणे जिल्हातून मागणी आहे. त्यामुळे सर्व उपवासाच्या पदार्थांच्या भावात तेजी निर्माण झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
तामिळनाडू येथून दोन दिवसांपूर्वी जेमतेम एक ट्रक म्हणजे दोनशे ते तीनशे साबूदाण्याच्या पोत्यांची आवक झाली आहे. सध्या मालवाहतूकदारांचा संप सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूत मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत. त्याचा परिणाम आवकेवर झाला आहे. परिणामी भावात प्रतिक्विंटलमागे 300 रुपयांनी वाढ झाली आहे. साबूदाण्याच्या हंगाम संपला असून, नवीन माल येण्यास ऑक्‍टोंबर महिना उजाडणार आहे. त्यामुळे यापुढेही साबूदाण्याचे भाव तेजीत राहण्याची अपेक्षा आहे. घाऊक बाजारात साबूदाण्याची प्रतिकिलोची विक्री 44 ते 53 रुपये भावाने होत असल्याचेही व्यापारी अशोक लोढा यांनी सांगितले. पुणे विभागातून विशेषत: कराड, मलकापूर भागातून आणि कर्नाटकातून मिळून रताळींची एकूण 30 ट्रक आवक झाली आहे. घाऊक बाजारात कर्नाटक रताळांना प्रती दहा किलोस 120 ते 180 रुपये, तर कराड, मलकापूर भागातील रताळांना दहा किलोस 250 ते 300 रुपये भाव मिळत आहे. तर, भुईमूगाची येथील बाजारात 200 पोती आवक झाली आहे. घाऊक बाजारत किलोस 250 ते 350 भाव मिळत आहे. आवकेसह मागणीतही वाढ झाल्याने भाव स्थिर राहिले असल्याची माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.
खजुराच्या मागणीत मोठी वाढ
आषाढी एकादशीसाठीनिमित्त खजुराला मोठी मागणी आहे. पालख्या पुण्यात आल्यापासून खजुराला मागणी आहे. नागरिक वारकऱ्यांना वाटण्यासाठी खजुराची खरेदी करत असतात. त्यामुळे दरवर्षी या काळात खजुराला मागणी असते. याविषयी व्यापारी नीलेश शेठ म्हणाले, आखाती देशातून मुंबई येथे खजुराची आवक होते. तेथून पुण्यात खजुर दाखल होत असतो. नेहमीचा विचार केल्यास दर पंधरा दिवसाला 25 टन खजुराची आवक शहरात होत असते. मात्र, आता त्यामध्ये दुपटीने वाढ झाली असून, या पंधरा दिवसात 50 टन आवक झाली आहे. उपवासासाठी लाल खजुराला मोठी मागणी असून, घाऊक प्रती किलोस 80 रुपये भाव मिळत आहे. येथून शहर, जिल्हा, सोलापूर जिल्हा, मराठवड्यात जालना, औरंगाबाद, नांदेड, परभणी जिल्ह्यातील व्यापारी खरेदी करत असतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button