breaking-newsमहाराष्ट्र

आमदार वैभव नाईक कोरोनाची लागण

सिंधुदुर्ग : आमदार वैभव नाईक यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह मिळाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. आज सकाळी त्यांची कोरोना टेस्ट झाली होती. उशीरा आलेल्या रिपोर्ट मध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सिव्हिल सर्जन डॉक्टर धनंजय चाकोरकर यांनी ही माहिती दिली आहे. आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी दौरा केला आहे. यामुळे ते अनेकांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंता वाढल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून वैभव नाईक यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांनी कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. वैभव नाईक यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं कळतं आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना संपर्क केला जात असून त्यांची ही कोरोना टेस्ट केली जाणार असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button