Breaking-newsमहाराष्ट्र
आमदार राहूल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना युतीकडून लोकसभेची उमेदवारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/kanchan-kul.jpg)
मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री उशिरापर्यंत भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरु होती. या बैठकीत अनेक उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र यातील महत्त्वाचं म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातून रासपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
आमदार राहुल कुल रासपचे आमदार असले तरी मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कुल यांची जवळीक वाढली होती त्यामुळे कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा आहे. मात्र या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये मागच्या निवडणुकीत भाजपाला साथ देणाऱ्या महादेव जानकर यांना डच्चू देत मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहे. एकीकडे रासप आमदारांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर केली तर दुसरीकडे महादेव जानकर यांना बारामतीतून तिकीट नाकारले.