breaking-newsमहाराष्ट्र

आमच्यामुळे देवेंद्र फडणवीस राजकारणात – नितीन गडकरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्यामुळे राजकारणात आले अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील राजकारणात होते, मात्र त्यांनी मुलाला राजकारणात आणलं नाही. आम्ही त्यांच्या वडिलांना विनंती करुन राजकारणात आणलं अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपुरात गोर बंजारा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात आणण्यासंबंधी सांगताना नितीन गडकरी बोलले की, ‘देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांच्या नेतृत्वात मी काम केलं आहे. माझ्या मुलाला तिकीट द्या असं त्यांनी मला कधीच सांगितलं नव्हतं. मी आणि छोटू भय्या नारकर असे आम्ही दोघे त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी मी त्यांना देवेंद्र फडणवीस यांना महापालिकेचं तिकीट द्यायचं आहे, त्यामुळे त्यांना राजकारणात पाठवा अशी विनंती केली. यावर त्यांनी आपल्याला काहीच अडचण नसून देवेंद्र फडणवीस यांना विचारायला सांगितलं. त्याची तयारी असेल तर जावं’.

फक्त आई-वडील राजकारणात आहेत म्हणून एखाद्याला तिकीट द्यावं हे चालणार नाही असंही नितीन गडकरी बोलले आहेत. राजकारणात येण्याआधी अनेकजण समाजाच्या विकासाच्या गोष्टी करत असतात. पण एकदा निवडून आले की अनेकजण समाजाला विसरतात. मग घराणेशाही सुरु होते अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

‘मुख्यमंत्र्यांची मुलगी लहान आहे आणि माझ्या कुटुंबातील कोणीही राजकारणात येण्यास इच्छुक नाही’, असं सांगत त्यांनी मी आणि मुख्यमंत्री घराणेशाहीपासून दूर आहोत असं सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button