अहमदनगरमध्ये लॉकडाऊनची गरज नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Hasan-Mushrif-with-mask-and-glows.jpg)
अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अहमदनगरला लॉकडाऊनची कोणतीही गरज नाही. प्रशासनाने सर्व खबरदारी घेतल्याचं मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे . नागरिकांनीच योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे तूर्तास तरी अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. हसन मुश्रीफ यांनी आज (25 जुलै) जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही आढावा बैठक झाली.
ग्रामपंचायत मुदत संपल्यावर पालकमंत्र्यांच्या शिफारशीने ग्रामपंचायतवर प्रशासक नेमावा असं परिपत्रक ग्रामविकास विभागाने काढलं आहे. यावर उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश काढत प्रशासक हा शासकीय अधिकारी नेमावा असं म्हटलं. शिवाय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पालकमंत्र्यांच्या शिफारशीला विरोध केला. मात्र, गावगाडा चालू राहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती असल्याचं स्पष्टीकरण हसन मुश्रीफ यांनी दिलं. इतकेच नाही तर सध्या ग्रामपंचायत कारभार चालवणं हा छातीवरचा धोंडा असल्याचंही ते म्हणाले.