…असे कितीही वादळे आली तरी मी घाबरत नाही -पंकजा मुंडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/PhotoGrid_.jpg)
- मला विरोध करण्यासाठीच देश पातळीवरच्या नेत्याला बीडमध्ये मुक्कामास बोलावले
बीड- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा सवांद दौरा, युवा सवांद यात्रा काढण्यात येत आहेत. राज्यात राष्ट्रवादीच्या दिग्ग्ज नेत्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचार सुरु केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष्य शरद पवार यांनी देखील मैदानात उडी घेतली असून बीडमध्ये सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्यात शरद पवारांनी हजेरी लावली होती. या मेळाव्यावर आणि शरद पवारांवर पंकजा मुंडेंनी निशाणा साधला.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश आडसकर यांच्या चौंडी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम माझ्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला मला विरोध करण्यासाठीच देश पातळीवरच्या नेत्याला बीडमध्ये मुक्कामास बोलावले आहे परंतू असे कितीही वादळे आली तरी मी घाबरत नाही. असे म्हटले आहे.