अबब…इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलला मागे टाकत डिझेलनं गाठली ऐंशी! हे आहेत आजचे दर
मुंबई: इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल जास्त महाग झालेलं आहे. पेट्रोलला मागे टाकत डिझेलनं तब्बल ऐंशी गाठल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई ते दिल्ली सगळ्या शहरांमध्ये जवळपास डिझेल वाढलेलं आहे. सलग 19व्या दिवशी दिल्लीमध्ये डिझेल 14 पैशांनी तर पेट्रोल 16 पैशांनी महाग झालेलं आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार शहरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर…
दिल्ली- डिझेल 80.0 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 79.92 रुपये प्रति लिटर
कोमुंबईलकाता – डिझेल 75.18 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 81.61 रुपये प्रति लिटर
मुंबई- डिझेल 78.34 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 86.70 रुपये प्रति लिटर
चेन्नई-डिझेल 77.29 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 83.18 रुपये प्रति लिटर
बंगळुरू-डिझेल 76.09 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 82.52 रुपये प्रति लिटर
लखनऊ-डिझेल 72.4 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 80.59 रुपये प्रति लिटर