अंधभक्त, ‘भक्त’ कसा ओळखावा?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/1bhakt.jpg)
पुणे – सोशल नेटवर्किंगवर अनेकजण ‘अंध भक्त’ म्हणून प्रतिक्रिया नोंदवताना दिसतात. पण… हे अंध भक्त नेमके कोण? असाही प्रश्न अनेकांना पडत असेल. पण, राष्ट्रवादी काँग्रेसने एक ट्विट करत अंध भक्त कसे ओळखाल याचे उत्तर दिले आहे.
राष्ट्रवादीने ‘तोची भक्त जाणावा…’ असे शिर्षक देऊन एक कार्टून ट्विट केले आहे. अंध भक्त ओळखण्याच्या सोप्या पद्धती असा उप मथळा देत हे व्यंगचित्र ट्विट केले आहे. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
काय आहे व्यंगचित्रात?
भक्त कसा ओळखावा?
एका कोपऱ्यात कुर्ता घातलेल्या कार्टुनच्या डोक्यावर भक्त असे दाखवले आहे. कुर्तावर मोदींचे नाव अनेकदा लिहिले आहे. शिवाय, भक्त कसे ओळखाल म्हणून पाच पर्याय दिले आहेत.
1) अपमानकारक आणि आक्षेपार्ह भाषा,
2) कोणत्याच मुद्द्यांचा अभ्यास नाही
3) सोशल मीडियावर फेक फॉरवर्ड्स
4) खालच्या स्तरावरची टीका
5) राष्ट्रभक्तीचा दिखाऊपणा
लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीसाठी विविध पक्षांकडून सोशल मीडियाचा मोठा वापर केला जात आहे. राष्ट्रवादीने मोदी भक्तांवरून त्यांनी व्यंगचित्र ट्विट करत भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1111535887458930688