breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिला नाही

लातूर – राज्यातल्या पोलीस यंत्रणेवर, महिलांच्या सुरक्षिततेला घेऊन आधीच प्रश्नचिन्ह उठले असताना, राज्यातल्या महिलांना खरंच सुरक्षितता आहे का? हा सवाल पडावा अशी घटना, आंबेजोगाई शहरातील कोपरा इथे घडली आहे. २६ वर्षीय तरुणीवर, मस्तवाल गावगुंडांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकाच्या मदतीने अत्याचार करून, तिचे हालहाल करून, तिला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला असून, तिच्यावर बलात्कार करण्याचादेखील प्रयत्न केला आहे.

वाचा :-महाविकासआघाडी सरकार अस्थिर असल्याच्या भ्रमात कोणी राहू नये- खासदार संजय राऊत

गावातल्या या गुंडांच्या टोळक्याने सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकाच्या मदतीने, पिडीतेच्या घरासमोरच्या व आजूबाजूच्या जागेवरचे बांधकाम अतिक्रमण असल्याचे सांगत पाडायला सुरुवात केली. त्यांनी घरासमोरील देवीच्या मूर्तीची विटंबना केली, तसेच जेसीबी लावून जमीनसुद्धा उकरण्यास सुरुवात केली.

यावेळी पिडीतीने त्यांना याचे कारण व त्यांच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली असता, त्यांनी तिच्याशी अर्वाच्य भाषेत बोलण्यास सुरुवात केली. पिडीतेने त्यांना विरोध करत या घटनेचे व्हिडीओ शुटींग सुरु केले. याच्या रागातून पिडीतेचा मोबाईल हिसकावून घेत, सर्वांनी तिला बेदम मारहाण करण्यास सुरु केली व जेसीबी खाली ढकलून देण्याचाही प्रयत्न केला.

त्यानंतर गावगुंडांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, परंतु, हे घृणास्पद कृत्य अयशस्वी झाल्यानंतर, त्यांनी विनयभंग करीत, तिच्या गुप्तांगावर दगड मारून आणि कटरसदृश वस्तूने तिच्या अंगावर वार करून, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. लाजिरवाणी गोष्ट म्हणजे, या सर्व अत्याचारात काही महिलांनीही गुंडांना साथ दिली आहे. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून १७ जणांवर किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, १७ आरोपींपैकी पैकी केवळ दोनच आरोपींनाच अटक करण्यात आली आहे.

जखमी पिडीतेवर किनगावच्या शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून, नंतर तिला आंबेजोगाई येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button