breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

Ashok Saraf | ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.

महाराष्ट्राचे नाव देशात आणि जगात दुमदुवून टाकणाऱ्या महान व्यक्तींचा त्या त्या. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. या पुरस्काराची सुरूवात १९९५ साली युती सरकार असतांना करण्यात आली. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार हा राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान असून साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि सार्वजनिक प्रशासन यांसारख्या विविध क्षेत्रांतील अपवादात्मक कामगिरीची दखल या पुरस्कारच्या वेळी दखल घेण्यात येते. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे प्रथम प्राप्तकर्ते असताना १९९६ मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे.

हेही वाचा    –    मोठी बातमी! वंचित आघाडीला महाविकास आघाडीत अधिकृत स्थान 

महाराष्ट्र भूषण पुरस्कारचे स्वरूप २०२३ च्या निकषानुसार विजेत्याला २५ लाख रूपये रोख, शाल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येत आहे. सुरूवातीला पुर्वी ५ लाख रूपये रोख आणि प्रशस्तीपत्र दिले जात होते. सप्टेंबर २०१२ मद्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले असून या पुरस्काराची रक्क्म ५ लाख रूपयांवरून १० लाख रूपये करण्यात आली होती. त्यानंतर वाढवण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button