breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

लोकसभा निवडणूक रणसंग्राम: वैद्यकीय क्षेत्रात देशाची प्रगती; म्हणून मोदींना साथ!

सोलापूरमधील डॉक्टरांच्या भावना : महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी साधला संवाद

सोलापूर : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशाने वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रात प्रगती केली आहे. कोविडसारख्या महामारीच्या काळात भारताने ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या हेतुने संपूर्ण जगाला मदतीचा हात दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या. या करिता ‘आयुष्यमान भारत’ सारखी महत्त्वाकांक्षी योजना राबवली. त्यामुळे सामान्य नागरिकांना आधार मिळाला. यासाठी आता पुन्हा एकदा मोदींना साथ देणार आहोत, असा विश्वास सोलापूरातील डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांनी सोलापूर शहरातील अनेक डॉक्टरांशी संवाद साधला. याप्रसंगी डॉ. अमोल पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, भाजपा नेते जयसिंगनाना आवताडे, डॉ. शैलेश पाटील, डॉ. सुनील हिलालपुरे, डॉ. मुक्तेश्वर शेटे, डॉ. अमोल माळगे, डॉ. होणराव तसेच अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

देशभरातील नागरिकांसाठी ‘आयुष्मान भारत’ योजना अत्यंत महत्त्वाची ठरली. प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विम्याचं संरक्षण देणाऱ्या या योजनेत ६ कोटी ७० लाखांपेक्षा अधिक गरजुंवर उपचार झाले आहेत. त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय क्षेत्रात चांगली कामगिरी होत आहे, जनसामान्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा आदरणीय मोदीजीनाच पंतप्रधानपदी पहायचं आहे़, असे मत सर्व डॉक्टरांनी व्यक्त केले.

पूर्ण ताकदीने आपल्यासोबत : शिवानंद पाटील

दरम्यान, भाजपा जेष्ठ नेते शिवानंद (अण्णा) पाटील यांच्या निवासस्थानीही सातपुते यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शिवानंद अण्णा यांनी त्यांचे स्वागत करत लोकसभा विजयासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. या भेटीदरम्यान पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी पूर्ण ताकदीने आपल्या सोबत आहे, असा विश्वास त्यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button