breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अंबरनाथ एमआयडीसीत कामगारांचा तुटवडा, महिन्याला 2100 कोटींचा आर्थिक फटका

अंबरनाथ | आशिया खंडातली सर्वात मोठी एमआयडीसी अशी ओळख असलेल्या अंबरनाथ एमआयडीसीत कामगार तुटवड्यामुळे सध्या प्रचंड नुकसान होतं आहे. परप्रांतीय कामगार गावी परतल्यानं एमआयडीसीत ही परिस्थिती ओढावली आहे.

अंबरनाथ एमआयडीसीत 1 हजार पेक्षा जास्त कंपन्या असून तिथे जवळपास 25 हजार परप्रांतीय कामगार काम करतात. यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त कामगार गावी परतले असून त्यामुळे अकुशल कामगारांचा मोठा तुटवडा एमआयडीसीत निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला आहे. शिवाय निर्यातही बंद आहे. त्यामुळे अंबरनाथ एमआयडीसीला महिन्याला तब्बल 2100 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसत असल्याची माहिती कारखानदारांची संघटना असलेल्या अॅडीशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (आमा) अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिली आहे.

दुसरीकडे मनसेनं हा तुटवडा भरून काढण्यासाठी मराठी कामगारांना संधी द्यावी, अशी मागणी आमा संघटनेकडे केली आहे. याबाबत मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय गुरव यांनी एमआयडीसीत काम करण्याची इच्छा असलेल्या मराठी बेरोजगार तरुणांची यादी आमा संघटनेला दिली असून यापुढे पळून जाणाऱ्या परप्रांतियांऐवजी स्थानिकांना कंपन्यांनी काम देण्याची मागणी मनसेने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button