breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: बिअरची वाहतूक करणारा ट्रक उलटला, लाखोंचे नुकसान

पुणे-बंगळुरू महामार्गावर उडतरे(ता.वाई) गावानजीक बिअरची वाहातूक करणारा मालट्रक उलटला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाला नाही. मात्र लाखो रुपयांची बिअर रस्तावर पाण्यासारखी वाहात होती.गुरुवारी पुण्याहून साताराच्या दिशेने जाणाऱ्या माल ट्रक क्रमांक (एमएच ऐएल ५२५० ) च्या चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटला व रस्त्यावर आडवा पडला.

सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही परंतु ट्रक मधील विक्रीसाठी जाणाऱ्या बिअरच्या बाटल्या फुटून लाखो रुपयांचे  नुकसान झाले.  अपघाता नंतर भुईंज पोलिसानी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. भुईंज पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button