breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत २ हजारांची भर

घरगुती गणपतींच्या संख्येत ३६ हजारांची वाढ

रस्ते, पदपथांवरील मंडप परवानगीवरून गोंधळ उडालेला असताना गतवर्षांच्या तुलनेत यंदा मुंबईमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये तब्बल २,२४९मंडळांची भर पडली आहे. त्याच वेळी गतवर्षीच्या तुलनेत यंदा घरगुती गणपतींच्या संख्येतही सुमारे ३६,२९१ ने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

समुद्रकिनारे, नद्या, तलाव, कृत्रिम तलाव आदी ठिकाणी विसर्जन केल्या जाणाऱ्या सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्तीच्या संख्येचा आढावा पालिकेकडून घेण्यात येतो. गेल्या वर्षी मुंबईमधील नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जनस्थळी सुमारे ११,०९८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीचे, तर एक लाख ८५ हजार ७३५ घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते. यंदा  १३,३४७ सार्वजनिक आणि दोन लाख २२ हजार २६ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. या आकडेवारीवरून गतवर्षीच्या तुलनेत यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या संख्येत २,२४९ ने भर पडल्याचे निदर्शनास आले आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत घरगुती गणपतींची संख्या ३६,२९१ ने वाढली आहे.

मुंबईत स्थायिक झालेल्या परप्रांतांतील नागरिकांनीही यंदा मोठय़ा प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात गुजराती आणि उत्तर भारतातील मुंबईस्थित नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक आणि घरगुती गणपतींच्या संख्येत वाढ झाली आहे.  – गिरीश वालावलकर, मुख्य कार्यवाह, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button