breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Lockdown | अकोल्यात पोलिसांचे खायचे हाल

अकोला | कोरोना विषाणूच्या प्रकोपानं संपुर्ण देश सध्या लॉकडाऊन आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे कर्तव्यावरील पोलीस, रस्त्याच्या कडेला राहणारे भिकारी, ट्रकचालक यांच्या खाण्याचे मोठे हाल होत आहेत. संचारबंदी लागू असतना अनेकजण नियमांचे उल्लंघन करताना दिसतायत.

त्यामुळे पोलिसांना २४ तास डोळ्यात तेल घालून खडा पहारा द्यावा लागतोय. हॉटेल्स बंद असल्याने ट्रकचालकांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे. रस्त्यांवर रहदारी नसल्याने, माणसं घरातून बाहेर न पडल्याने रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या भिकाऱ्यांचे देखील हाल झाले आहेत. हे वास्तव पाहता जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना पुढे आल्या आहेत. अकोल्यातील श्री सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या तेरा दिवसांपासून तेराशेच्या जवळपास लोकांच्या नाश्त्याची आणि जेवणाची व्यवस्था दररोज केली आहे.

कोरोना विषाणूमूळं माणसाचं जगणंच सध्या लॉक डाऊन झालंय. या विषाणूशी लढण्यासाठी देशभर सध्या संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, यामूळे अनेकांच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. कर्तव्यावरील पोलीस, रस्त्याच्या कडेला राहणारे भिकारी, ट्रकचालक यांचे खाण्याचे मोठे हाल सध्या होत आहेत. अकोल्यातील पोलीस लॉनवर सकाळी सहापासूनच या अनोख्या भोजन यज्ञाला सुरूवात होतेय. सकाळी ९ पर्यंत कर्तव्यावरील ५०० पोलीस आणि इतर लोकांना चहा आणि नाश्त्याचं वाटप होतंय. त्यानंतर समितीचे कार्यकर्ते शहरासह लगतच्या भागात पोलीस, संचारबंदीत अडकलेले ट्रकचालक, गरजूंना भोजन वाटपाचं काम करतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button