breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

मराठमोळ्या हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू भक्कमपणे मांडणारे मराठमोळे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती झालीय. ब्रिटनच्या न्याय मंत्रालयाने नव्या नियुक्त्या संदर्भातील यादी प्रसिद्ध केलीय. त्यामध्ये मराठमोळे हरीश साळवे यांच्या नावाचा समावेश आहे. हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीसाठी कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे क्वीन काऊंसिल म्हणून काम पाहतील.

१६ मार्च रोजी हरीश साळवे यांची अधिकृतपणे नियुक्ती होणार आहे. ब्रिटिश सरकारच्या माहितीनुसार, महाराणीनं ११४ वकिलांना QC म्हणून नियुक्त केलंय. याशिवाय १० वकिलांचा सन्मान करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. इंग्लंड आणि वेल्सच्या न्यायालयांसाठी महाराणीचे वकील (QC) म्हणून हरीश साळवे यांना नियुक्त करण्यात आलंय. ब्रिटिश महाराणीकडून हे पद वकिलांचं विशेष कौशल्य पाहून प्रदान करण्यात येतं.

आंतरराष्ट्रीय पातळीवर हरीश साळवे यांच्या नाव प्रसिद्ध आहे. त्यांनी नागपूर युनिव्हर्सिटीतून एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलंय. १९८० मध्ये त्यांनी वकिली सुरू केली. हरीश साळवे यांची १९९२ मध्ये दिल्ली हायकोर्टानं ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती केली. १९९९ ते २००२ पर्यंत त्यांनी देशासाठी सॉलिसिटर जनरल म्हणून काम केलं. या दरम्यान त्यांनी देश-विदेशातील मोठ-मोठी प्रकरणं मोठ्या हुशारीनं सांभाळली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button