breaking-newsताज्या घडामोडी

मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करा? तरच करता येणार मतदान

Voter ID and Aadhaar Linking | भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांना वोटर आयडी हे त्यांच्या आधार कार्डशी लिंक करण्याचे आवाहन केले आहे. मात्र कित्येक नागरिकांनी लिंक केलेले नाही. तर आज आपण घरबसल्या वोटर आयडी आणि आधार कार्ड लिंक कसे करायचे हे जाणून घेऊयात..

अशाप्रकारे करा मतदान कार्ड आणि आधार कार्ड लिंक :

सर्वप्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलच्या https://www.nvsp.in/. या अधिकृत वेबसाइटवर जा.

यानंतर क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा.

यानंतर तुमचा EPIC क्रमांक आणि आधार क्रमांक यांसारखी माहिती भरा.

हेही वाचा     –    ‘शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच’; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 

त्यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल.

दिलेल्या ओटीपीची पडताळणी पूर्ण झाल्यावर तुमचे आधार कार्ड तुमच्या मतदार आयडीशी लिंक करण्याची विनंती सबमिट करा.

विनंती सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन मेसेज येईल, ज्यामध्ये तुमची विनंती यशस्वीरित्या सबमिट केली गेली आहे असे सांगितले जाईल.

त्यानंतर निवडणूक आयोग तुम्ही दिलेल्या सर्व तपशीलांची पडताळणी करेल.

सर्व माहिती योग्य आणि खरी असल्याची ओळख पूर्ण झाल्यानंतर तुमचे आधार कार्ड तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केले जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button