TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बोपखेल येथे बहुउद्देशीय इमारतीचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

पिंपरी प्रतिनिधी

राज्याचे माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या (रविवारी) पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात विकसित झालेल्या कामांचे उद्घाटन आणि नवीन कामांचे भूमीपूजन दुपारी दोन वाजल्यापासून फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, आमदार महेश लांडगे उपस्थित असणार आहेत. तर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे असणार आहेत. नगरसेवकांचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपणार आहे. कार्यकाळ संपण्यास आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे विकासकामांची उद्घाटने, भूमीपूजनाचा धडाका सुरु आहे. विविध विकासकामांची उद्घाटने, भूमीपूजनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रविवारी शहरात येणार आहेत. दुपारी दोन वाजल्यापासून उद्घाटनाला सुरुवात होईल. याच अंतर्गत बोपखेल गावातील पूर्ण झालेल्या बहुउद्देशीय इमारतीचे रविवारी सायंकाळी ४ वाजता लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.अशी माहिती उपमहापौर हिरानानी घुले यांनी दिली.

*अशी आहे बहुउद्देशीय इमारत
१:- पैलवान मंडळींसाठी तालीम
२:- करसंकलन कार्यालय
३:- माझ्या माता बहिणीसाठी योगा केंद्र
४:- शरीरयष्टी साठी व्यामशाला
५:- तरुण पिढी साठी MPSC ,UPSC अभ्यासिका केंद्र .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button