ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

कायद्याचे पालन करून सोसायटीमध्ये एकजूट जोपासा!

वडगाव मावळचे पोलिस निरिक्षक कुमार कदम यांचे प्रतिपादन

वडगांव (मावळ) ः मावळ तालुका समृद्ध तालुका आहे. निसर्गाचे भरभरून देणं लाभलेला हा तालुका. येथील एक्झर्बिया सोसायटीमधील निसर्गसंपन्न वातावरण हे येथील रहिवाशांना नसिबाने मिळाले आहे. येथील रहिवाशी फार नशिबवान आहेत. सोसायटीमध्ये असलेली एव्हढी मोठी मोकळी स्पेस, इथे असलेले लोक यांमुळे या सोसायटीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. येथील रहिवाशांनी कायद्याचे पालन करत आपापसांत एकजूट जोपासा. एकीची ताकत ही खूप मोठी असते. याच एकजूटीमुळे सोसायटीमधील विविध समस्या सहज सोडवल्या जातात, असे प्रतिपादन वडगांव माळचे पोलिस निरिक्षक कुमार कदम यांनी केले. एक्झर्बिया गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आरतीसाठी पोलिस निरिक्षक कदम उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न शिरोडकर, उपाध्यक्ष सुनीलभाऊ पवार, खजिनदार पंढरीनाथ हिंगे, दीपक पाटील, शैलेश घाग, योगेश हुळे, दिनेश सकट, सुमीत पुरी, गणेश क्षिरसागर यांनी तसेच इतर सदस्यांनी त्यांचे स्वागत केले.

विविध उपक्रम राबवणाऱ्या प्रतिनिधींचे कौतुक…
सोसायटीमध्ये विविध उपक्रम राबवणाऱ्या मंडळाच्या प्रतिनिधींचे पोलिस निरिक्षक कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी भरभरून कौतुक केले. मागील ३ वर्षांपासून एक्झर्बिया अॅबोड गणेश मंडळ सामाजिक उपक्रमात अग्रेसर असून, समाजापुढे वेगळा आदर्श नेहमीच ठेवला जात आहे. भजनातून सामाजिक एकता, प्रबोधन, व्याख्यानातून जनजागृती, सांस्कृतिक कार्यक्रम व त्याचबरोबर हिंदू-मुस्लिम तसेच सर्व समाज बांधव मिळून हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. मंडळाच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

समाजासाठी, जनतेच्या रक्षणासाठी पोलिस अहोरात्र झटत असतात.सणासुदीच्या काळात तर त्यांच्या सुट्ट्याही रद्द केल्या जातात.जनतेला सण, उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोणत्याही सणासुदीचा आनंद उपभोगता येत नाही. गणेशोत्सवही त्याला अपवाद नाही. घरात गणपती असला तरी कर्तव्य व कामाचा भाग म्हणून सतत घराबाहेर राहावे लागते. घरातील गणपतीची साधी आरतीही त्यांना करता येत नाही. आपल्या कुटुंबियांनाही त्यांना वेळ देता येत नाही. यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणूनच एक्झर्बिया अॅबोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पोलिस निरीक्षक कदम साहेब व त्यांचे सहकारी यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
-सुनील पवार,

उपाध्यक्ष एक्झर्बिया अॅबोड गणेशोत्सव मंडळ

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button