पिंपरी / चिंचवडपुणे

पुणे मेट्रोच्या 79 मीटर ओपन वेब गर्डरचे लॉन्चिंग

पुणे l प्रतिनिधी

पुणे मेट्रोची सेवा काही अंशी सुरु झाली आहे. तर उर्वरित ठिकाणी वेगाने काम सुरु आहे. उर्वरित मेट्रो मार्ग देखील लवकरच सुरु केला जाणार आहे. त्यादृष्टीने मेट्रोकडून कामे केली जात आहेत. नुकताच खडकी येथे 79 मीटर ओपन वेब गर्डरचे सुरळीत लॉन्चिंग करण्यात आले.

पुणे मेट्रो हा पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांच्या वैभवात भर घालणारा प्रकल्प आहे. वाहतूक कोंडीतून मोकळीक मिळण्यासाठी मेट्रोची मदत होईल. तसेच मेट्रोचे अधिकतम परिचालन हे सौरउर्जेवर असल्याने पर्यावरण पूरक प्रवासाला देखील पुणे आणि पिंपरीचिंचवडकर हातभार लावणार आहेत.

पुणे मेट्रोच्या 12 किलोमीटरवरील परिचालन 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरु करण्यात आले. त्यानंतर पुणेकरांनी मेट्रोला उदंड प्रतिसाद दिला आहे. मेट्रो कडून उर्वरित मार्गाचे काम वेगाने केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे खडकी येथे रेल्वे मार्गावरून वेब गर्डर टाकण्यात आला आहे.

अवघ्या पाच तासात 79 मीटर लांबीचा वेब गर्डर मेट्रोकडून लॉन्च करण्यात आला. 11 मार्च रोजी हे काम करण्यात आले. दरम्यान या कामासाठी रेल्वेच्या काही फे-या रद्द करण्यात आल्या होत्या. तर काही रेल्वे उशिराने धावल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button