पिंपरी / चिंचवडपुणे

कुंडमळ्यात दोन तरुणींचा आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी l प्रतिनिधी

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुंडमळ्यात उडी मारून दोन तरुणींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि. 16) दुपारी घडली. त्यातील एका मुलीचा मृत्यू झाला. तर दुस-या तरुणीला वाचवण्यात यश आले आहे.

योगिता नागेश म्हेत्रे (वय 23, रा. पाटील चाळ देहूरोड), इंदू बसप्पा मॅथलेरी (वय 18, रा शीतळा नगर, देहूरोड) या दोघींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

योगिता आणि इंदू या दोघी बुधवारी दुपारी मोपेड दुचाकीवरून कुंडमळा येथे गेल्या. तिथे त्यांनी डोहात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोन मुली पाण्यात पडल्याचे एका स्थानिक तरुणाने बघितले आणि त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. यामध्ये योगिता म्हेत्रे हिला त्याने वाचवले. परंतु दुस-या तरुणीला तो वाचवू शकला नाही.

शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि वन्यजीव मावळ या दोन संस्थांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. दोन्ही पथकांनी इंदू हिचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. या दोघींनी हा प्रकार का केला याबाबत अद्याप समजू शकले नाही. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button